ग्रीन टी हे अलिकडील काळात एक आरोग्यदायी पेय असल्याचे बहुतेकांनी मान्य केले आहे. ग्रीन टी मुळे अनेक प्रकारचे फायदे होतात. यार्पैकीच एक सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे हाडांची मजबुती.

ग्रीन टी पिल्याने ज्याप्रमाणे आपण इतर अनेक तक्रारी दुर करू शकतो. तसेच ग्रीन टी पिण्याने आपण हाडे मजबुत बनवू शकतो.

पायांवर सुज असेल तर ग्रीन टी पिण्याने ही सुज कमी करता येऊ शकते. तसेच पाय दुखणे अथवा संधीवातामुळे किंवा इतर प्रकारच्या सांधेदुखीमध्ये ग्रीन टी पिल्याने फायदा होतो.

आर्थरायटिस ऍन्ड रुमॅटोलॉजी या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनपर लेखात असे म्हंटले आहे की हाडामध्ये जर गाठ असेल तर बहुतेक वेळा ती इतर औषधांनी जातेच असे नाही. तेव्हा ग्रीन टी घेतल्याने ही गाठ कमी होऊ शकते.