खूप जास्त फायदेशीर आहे. बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता या सुकामेव्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते.

विशेष म्हणजे सुक्यामेव्याने वजन कमी होण्यासही मदत होते, मात्र यासाठी ते प्रमाणात खाणे महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त, आरोग्य (Health) तज्ञ म्हणतात की ते मधुमेह (Diabetes) आणि हृदयाच्या समस्यांसारख्या नियंत्रण ठेवण्यासाठी देखील सुकामेवा खूप जास्त फायदेशीर आहे. सुक्यामेव्याचे आपल्या आरोग्याला नेमके कोणते फायदे होतात, याबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात

काजू खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. जास्त प्रमाणात आणि कधीही खाणे योग्य नाही. ज्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. सुकामेवा योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. रोज सुकामेवा खाणे चांगले. कारण त्यात व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, सेलेनियम, कॉपर, मॅग्नेशियम आणि रिबोफ्लेविन भरपूर प्रमाणात असते. त्यात लोह, पोटॅशियम, झिंक, व्हिटॅमिन बी, नियासिन, थायामिन आणि फोलेट देखील मुबलक प्रमाणात असते. रोजच्या आहारात सुक्यावेव्याचा समावेश करावा.

रात्री भिजत ठेवून सकाळी खा

सुक्यामेव्यात भरपूर प्रमाणात हेल्दी फॅट प्रोटीन आणि फायबर असतात. जे पचनासाठी वेळ घेतात. म्हणजे आपली पचनसंस्था जरा जड होते. म्हणून नेहमीच सुकामेवा खाण्याच्या अगोदर पाण्यात भिजत ठेवा. यामुळे सुकामेव्यातील तापमान कमी होईल. तसेच, फायटिक ऍसिड आणि टॅनिनचे घटक मिळतील. रात्री सुकामेवा भिजवून सकाळी खाणे चांगले आहे. दररोजच सकाळी सुक्यामेव्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.