आपल्याला नेहमी कमी तेलकट अन्नघटक खाण्याचा सल्ला देण्यात येत असतो. अनेक जण आपल्या डाएटमधून तेलकट घटकांना बगल देत असतात.

परंतु काहीतरी कारणांमुळे इच्छा नसूनही आपण खूप तेलकट पदार्थ (Oily Food) खातो आणि त्यानंतर आपण हे खायला नको होते, याचा पश्चातापदेखील आपणास होत असतो. जंक फूड, जास्त तळलेले पदार्थांचे अतिसेवन (Overdose) शरीराला अत्यंत अपायकारक ठरत असते. यातून लठ्ठपणा, मधुमेह, उच्चरक्तदाब, ह्रदयाशी संबंधित अनेक आजार निर्माण होत असतात. त्यामुळे असे अन्नघटक मोजून मापूनच खाणे योग्य असते. परंतु अनेकदा कार्यक्रम, लग्न समारंभात तेलकट पदार्थ खाल्ले जाते. याचे अतिसेवन झाल्यास तुम्हाला पोटदुखी, सूज येणे आणि त्वचेवर पुरळ येणे, छातीत जळजळ होणे आदी विविध दुष्परिणाम (Side effects) दिसून येत असतात.

हे उपाय करा

  1. कोमट पाणी प्या : कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सक्रिय होते. हे पचण्यासारखे पोषक तत्व लवकर पचवण्यास मदत करते त्याचप्रमाणे पोटाशी संबंधित सर्व समस्या यातून दूर होण्यास मदत होत असते.
  2. भाज्या आणि फळे खा : ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅटचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. अशा परिस्थितीत फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने तुम्हाला फायदा होईल. ते शरीरातील जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजांची कमतरता पूर्ण करतात. सकाळच्या नाश्त्यात बिया असलेले फळ खा. जेवणाची सुरुवात सॅलडच्या वाटीने करा. जेवणात जंक फूड खाणे टाळावे. सकाळी निरोगी आणि पौष्टिक नाश्ता घ्या. आहारात भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. स्वतःला हायड्रेटेड ठेवा.
  3. डिटॉक्स ड्रिंक : तेलकट काहीही खाल्ल्यानंतर डिटॉक्स ड्रिंक घ्या, यातून शरीराला फायदा होईल आणि विषारी पदार्थ बाहेर पडतील. लिंबूपाणी प्या. यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होईल.
  4. प्रोबायोटिक्स फूड : प्रोबायोटिक्स फूड नियमित घ्या. तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर एक वाटी दही खाल्ल्याने खूप आराम मिळतो. दुसरीकडे, खूप तळलेले अन्न खाल्ल्यानंतर थंड गोष्टी टाळल्या पाहिजेत. यामुळे यकृत आणि आतड्यांचे नुकसान होउ शकते. तेलकट अन्न पचवणे कठीण असते.
  5. फिरायला जा : तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर फिरायला गेले पाहिजे. चालण्याने वजन कमी होण्यासही मदत होईल. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होईल.
  6. चांगली झोप घ्या : चांगली झोप तुमचा मूड दिर्घकाळ चांगला ठेवण्यास मदत करते. तेलकट अन्न खाल्ल्यानंतर शक्य तितकी विश्रांती घ्या. रात्रीचे जेवण आणि झोप यात नेहमी 2-3 तासांचे अंतर असावे. तेलकट अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपू नका. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने अन्न पचण्यास त्रास होतो. त्यामुळे चरबी जमा होण्याची शक्यता वाढते.