आजकालचा जमाना फास्ट फूडचा, पण याचे दुष्परिणाम दिसू लागतील तेव्हा कळेल की हे चमचमीत, जिभेला चटकवणारे पदार्थ किती घातक आहेत ते. जेव्हा ही आजची पिढी अनेक व्याधींनी त्रस्त होईल तेव्हा त्यांना नक्‍कीच कळेल सकस आहाराचे आणि व्यायामाचे महत्त्व.

फास्ट फूड हे आपली कार्यक्षमता घटवते तर सकस आहार आपली कार्यक्षमता वाढवते हे आता अनेकजणांना अनुभवाने कळाले आहे. चौरस आहार आणि त्याबरोबर व्हिटॅमिन पोटात जाणे फार आवश्‍यक आहे. शरीराच्या निरनिराळ्या महत्त्वाच्या इंद्रियांना त्याचे संरक्षण करणारे आणि त्यांना बळकटी देणारे अन्नघटक हे रोजच्या आहारातून पोटात गेलेच पाहिजेत.

त्वचेचे संरक्षण- मानवी शरीराच्या पृष्ठभागावरचा सर्वात मोठा अवयव म्हणजे त्वचा. त्वचेमधील पेशींची सतत झीज होत असल्याने त्या कमी होऊन त्यांची जागा नवीन पेशी घेत असतात. त्वचा निरोगी राहावी म्हणून जीवनसत्त्व सी अतिशय जरुरी आहे. यामुळे त्वचेतील ऑक्‍सिजन प्रवाह वाढतो. त्वचेला बळकटी आणणारे कोलॅजिन तयार करण्यात मदत करते. जखम, कापणे, भाजणे इ. प्रकार लवकर बरे होतात. इतकेच नव्हे तर शरीराच्या इतर भागात होणारा कॅन्सर आणि इंफेक्‍शन (जीवजंतूचा संसर्ग) यांनाही प्रतिबंध होतो.
सी व्हिटॅमिन कशाकशात?

व्हिटॅमिन सी असणारे पदार्थ म्हणजे पपई, संत्रे, डोंगरी आवळा, लिंबू इ. हे पदार्थसुद्धा आवडतात म्हणून अति खाणे वाईटच. ते प्रमाणातच घेतले पाहिजेत. नाहीतर पोटात गुब्बारा धरणे इ. त्रास होतात. हृदयाची ताकद वाढविण्यासाठी - नियमित व्यायामाबरोबरच हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी योग्य आहारही घेतला पाहिजे. कारण रक्‍तामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. म्हणूनच हृदयाची ताकद वाढण्यासाठी दुधी भोपळ्याचा रस रोज अनोशापोटी घ्याव्या, शिवाय सर्व प्रकारची फळे खावीत.

कणखर हाडांसाठी - शरीराचा महत्त्वाचा भाग म्हणजे हाडे. त्यांना बळकटी आणण्यासाठी कॅलशियम आवश्‍यक आहेच. पण फॉस्पेट अ, क आणि ड आणि मिनरलस (खनिजेही) हाडांना बळकटी आणतात आणि निरोगी बनवतात.

सांध्यांची बळकटी - संधिवात हा रोग वयस्कर व्यक्‍तींनाच होतो असे नाही तर तो कोणालाही होतो. याचे कारण सांध्यांचा कमकुवतपणा त्यामुळेच सांधेदुखी होते, पण यासाठी तांबं हे खनिज अतिशय उपयोगी ठरते. त्यामुळे हाडे (अस्थी) आणि सांधे बळकट होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते. हे दुर्मीळ खनिज लिव्हर, शिंपले, शेंगदाणे इ. मध्ये असते.

डोळ्यांचे आरोग्य - रताळी, बटाटे, गाजर आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये बेटा कारोटिन असते. त्यातील अ जीवनसत्वामुळे डोळ्यांना प्रतिकारशक्‍ती कॅलशियमचे प्रमाण 1/3 आहे.

केसांचे आरोग्य - केसांचे आजार म्हणजे केस गळणे, दुभंगणे, पांढरे होणे, कमजोर होणे इ. वर कीस्टाईन आम्लप्यातील अल्फार केरॅटिनमुळे केस निरोगी राहतात. त्यांची निकोप वाढ होते. यासाठी प्रथिने (प्रोटिन्स) असलेले अन्न म्हणजे चिकन, मांस, अंडी, चीज, दाणे इ. चा समावेश अन्नामध्ये करणे आवश्‍यक आहे.

म्हणूनच एकाच प्रकारच्या आहाराचा समावेश आपल्या रोजच्या जेवणात न करता निरनिराळ्या प्रकारचे अन्नघटक खाल्ले गेले पाहिजेत. जेणेकरून प्रत्येक इंद्रियाला, अवयवाला त्यांच्या त्यांच्या अन्नाचा पुरवठा होईल आणि ते अधिक कार्यक्षम होतील. त्यायोगे शरीराचे निरनिराळे अवयव, इंद्रिये बळकट होऊन अधिक कार्यक्षम बनतात.
अशक्‍तपणा आला असेल तर…

पातळ आहार ः मनुष्य ज्यावेळी अतिशय अशक्त आणि कमजोर होतो त्यावेळी पचायला सुलभ असा आहार द्यावा. या दृष्टीने पातळ आहार फार उपयोगी पडतो. संपूर्ण पातळ आहारात सर्व अन्नपदार्थांचा समावेश होतो. आईस्क्रीमही चालते. आईस्क्रीममध्ये उष्णांक 1,300 ते 1,580. प्रथिने 45 ग्रॅम्स.

कर्बोदके 150 ग्रॅम्स. चरबी 65 ग्रॅम्स असते. या आहारातील उष्णांकांचे प्रमाण वाजवी प्रमाणाइतके वाढविता येते. विशेषतः रोगी अनिश्‍चित काळ याच आहारावर राहणार असेल तर उष्णांकाचे प्रमाण वाढविणे आवश्‍यक आहे. यात पुढील अन्नपदार्थांचा समावेश असतो. सूप गाळलेले व मलईसहीत भाज्यांचे सूप.

खीर सर्व अन्नधान्यांची शिजवून मऊ केलेली खीर.
सार भाज्यांचे गाळलेले रस.
अंडी व त्यापासून तयार केलेली पेये.
दूध व त्यापासून तयार केलेली सर्व पेये आणि साय (मलई)
मऊ कस्टर्ड पुडिंग, जेली यांत साखर व लोणी यांचा भरपूर प्रमाणात उपयोग करावा.

मऊ आहार ः पूर्ण पातळ आहारांपेक्षा हा आहार आजारी माणसाला अधिक पसंत पडतो. शिवाय यात आहाराचे प्रमाण कमी असून सर्व सत्त्वे विपुल प्रमाणात मिळतात. या आहाराचे वैशिष्टय म्हणजे यात तंतुमय पदार्थाचे प्रमाण फारच कमी असते. पण इतर सर्व दृष्टीने हा पूर्णाहार असतो. आजारातून उठल्यानंतर व पूर्ण निरोगी अवस्था प्राप्त होईपर्यंत हा आहार घ्यावा. यात तळलेले पदार्थ संपूर्ण वर्ज्य करावेत. हा आहार खाण्यास सोपा, पचनाला सुलभ आणि अल्प उर्वरित पदार्थ शिल्लक राहणारा असा आहे. दात कमकुवत असणाऱ्या किंवा आजिबात नसणाऱ्या रुग्णांना तर हा आहार फारच उपयुक्‍त आहे.

या आहारात उष्णांकांचे सरासरी प्रमाण 1800 व 2000 असावे. पण प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार सर्व आहारसत्त्वांचे प्रमाण कमीजास्त करता येते. या आहारात दूध, ताक, साय. अंडे उकडलेले, पाण्यावर शिजविलेले किंवा अत्यंत थोड्या तुपात कमी उष्णतेने कुस्करलेले चीज किंवा पनीर, दुधात भिजविलेला ब्रेड. खिरीमध्ये गहू, तांदूळ, रवा, साबुदाणा, तवकील, नाचणी यांची. तंतूचे प्रमाण कमी असलेल्या मऊ शिजवलेल्या भाज्या. तसेच बीट, गाजर, हिरवे वाटाणे, बटाटे, रताळी, दुधी भोपळा इ. भाज्या. साले काढून शिजवलेली फळे किंवा फळांचे रस, पिकलेले केळ. भाज्यांचे गाळलेले सूप मलईसहित. सुकी फळेविरहीत पुडिंग, जेली, आईस्क्रीम.