आपला मेंदू (Brain) सर्व काही नियंत्रित करतो – हा आपल्या शरीराचा मुख्य अवयव आहे जो प्रत्येक कार्याशी एक जटिल संबंध सामायिक करतो.

मग ते आतड्याचे आरोग्य (Intestinal Health) असो वा हृदयाचे आरोग्य (Heart Health), लिव्हर (Liver) किंवा किडनीचे कार्य (Kidney Function) – या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती (Brain Health Tips) मेंदूमध्ये असते. आतड्याच्या आरोग्यासाठी चांगला आहार आवश्यक असतो, अगदी त्याच प्रमाणे मेंदूच्या कार्यामध्ये सुधारणा (Brain Health Tips) करण्यासाठी आहार सर्वात महत्वाची भूमिका बजावते.

स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आणि मेंदू पूर्णपणे मजबूत होण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे ते जाणून घेवूयात (What should we eat to increase your memory power?)…

1. डार्क चॉकलेट (Dark Chocolate)
डार्क चॉकलेट चवीला कडू असले तरी पण डार्क चॉकलेटची गणना आरोग्यदायी पदार्थांमध्ये (Healthy Foods) केली जाते, कारण त्यात आयर्न (Iron) आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म (Antioxidant Properties) असतात.

2. मसाले (Spices)
हळदीपासून ते केशर (Saffron), आले (Ginger) आणि इतर अनेक मसाले आपल्या जेवणाची चव तर वाढवतातच शिवाय आपल्या आरोग्यालाही अनेक प्रकारे फायदेशीर (Beneficial For Health) ठरतात. ते अँटी-इम्फ्लेमेटरी (Anti-inflammatory) आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे चांगले स्त्रोत आहेत, म्हणून ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि जळजळ यापासून संरक्षण करते.

कर्क्युमिन (Curcumin) सारखे संयुग अस्वस्थता किंवा चिंतेचा धोका कमी करते आणि ब्रेन केमिस्ट्री चांगले बनवते.

3. नट (Nuts)
बदाम (Almond), अक्रोड (Walnuts), काजू (Cashew) आणि ब्राझिलियन नट्स (Brazilian Nuts) सारखा सुकमेवा हेल्दी फॅटचा (Healthy Fat) चांगला स्त्रोत आहेत, जे मेंदूच्या कार्यास चालना देतात, सांध्यांना वंगण देतात आणि हृदय निरोगी ठेवतात. अक्रोडमध्ये आढळणार्‍या ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडमध्ये (Omega-3 Fatty Acid) अँटी-इम्फ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे स्मृती आणि विचार सुधारण्यासाठी ओळखले जातात.

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्सचे अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे स्मरणशक्ती (Memory) आणि विचारशक्ती (Thinking Power) सुधारते. नाश्त्यात काही बदाम खाल्ल्याने तुमच्या मेंदूचे आरोग्य सुधारू शकते.

4. एवोकॅडो (Avocado)
एवोकॅडो हे फळ भारतात खूप महाग आहे, म्हणूनच बहुतेक लोक ते खाऊ शकत नाहीत.
एवोकॅडो हे मॅग्नेशियमचा (Magnesium) एक उत्तम स्त्रोत आहे – हे एक असे पोषकतत्व आहे जे मेंदूच्या योग्य कार्याशी संबंधीत आहे.

1921 मधील एका रिपोर्टमध्ये असे दिसून आले की उत्तेजित नैराश्याच्या उपचारात मॅग्नेशियमचा खूप फायदा होतो.
मॅग्नेशियमची कमतरता उदासीनतेशी संबंधित असल्याचेही अनेक संशोधनात आढळून आले आहे.

5. फर्मेन्टेड फूड्स (Fermented Foods)
फर्मेन्टेड पदार्थांमध्ये बॅक्टेरिया (Bacteria) आणि यीस्ट (Yeast) असते, जसे की दही (Curd), किमची (Kimchi), कंबुचा (Kombucha)
आणि कोअरक्रॉट हे पदार्थ चांगल्या बॅक्टेरियाचे स्रोत आहेत, जे आतड्याचे कार्य सुधारतात आणि चिंता कमी करतात.

6. हिरव्या पालेभाज्या (Green Leafy Vegetables)
पालकासारख्या हिरव्या पालेभाज्या सहज मिळतात, पण बहुतेकांना या भाज्या आवडत नाहीत.
पण त्यांना कळत नाही की केल (Kale), मेथी, पालक (Spinach) यांसारख्या भाज्या, फोलेट (Folate),
आयर्न, व्हिटॅमिन बी9 (Vitamin B9) आणि फायबर (Fiber) सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात.

जर तुम्हाला तुमच्या मेंदूचे आरोग्य (Brain Health Tips) सुधारायचे असेल,
तर दररोज हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्यास आरोग्याला फायदा होऊ शकतो