आमरस, मुरांबा, लोणची असे आंब्याचे नानाप्रकार करून खाल्ले जातात मात्र आंब्याची 'कोय'ही तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे.'आंबे' हे  केवळ उन्हाळ्यातच मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारे फळ ! म्हणूनच या काळात डाएट, उन्हाचा कडाका अशा कारणांना बुट्टी देऊन प्रत्येकजण आंब्यांवर ताव मारतात. चवीला मधूर आणि अत्यंत पौष्टिक अशा आंब्याला भारताप्रमाणे भारताबाहेरही मागणी आहे. आंब्याचे नानाप्रकार बनवून त्यांचा आहारात समावेश केला जातो. मात्र बरेचजण आंबा खाल्ल्यानंतर त्याची कोय कचर्‍यात टाकून देतात. पण कोयींच्या आतील भागदेखील शरीराला पौष्टिक आणि चविष्ट असतो हे तुम्हाला ठाऊक आहे का?

म्हणूनच जेष्ठ आहारतज्ञ वसूमती धुरू यांनी आंबा व कोयीच्या पौष्टीकतेबद्दल विस्ताराने केलेले हे मार्गदर्शन -

हापूस आंब्याच्या कोयीतून मिळणारी पोषकता  - 

कॅलरीज - २२८

प्रोटिन - ५.१

कार्बोहायड्रेट -  ४३

तोतापूरी आंब्याच्या कोयीतून मिळणारी पोषकता - 

कॅलरीज - १५५

प्रोटिन - ३.३

कार्बोहायड्रेट - २९

कोयीचे आरोग्यदायी फायदे

  • भारतात तसेच युरोपीय देशातही कोयींची 'मार्केट व्हॅल्यू'  चांगलीच वाढली आहे. कोयींच्या गरातील स्निग्ध घटक शरीराला पौष्टिक असतात. म्हणूनच त्याचा वापर चॉकलेट्स आणि काही कॉस्मॅटिक्समध्ये केला जातो.
  • युरोपीय देशात लोण्याच्या जागी या दोन्ही उत्पादनांमध्ये कोयींचा गर वापराला जातो.

मग इतकी पौष्टिक आंब्याची कोय, फेकून देण्यापेक्षा त्याचा आहारात समावेश कसा करायचा.. हा प्रश्न पडलाय ना ? मग पहा कोयींपासून तयार केलेल्या काही चविष्ट रेसिपीज ...

  1. आंबे खाल्ल्यानंतर कोय उन्हात नीट सुकवून साठवा. गरजेनुसार त्या कोयी भाजून, फोडून त्यातील गर नुसताच खाल्ला तरीदेखील चविष्ट लागतो.
  2. भाजलेली कोय किसून त्यात कांदा, ओलं खोबरं. मीठ, तिखट व कोथिंबीर चिरून थंडगार कोशिंबीर बनवू शकता.
  3. कोयीच्या कोशिंबीरीमध्ये बेसन घालून वाफ़ दिल्यास स्वादिष्ट आणि पौष्टिक झुणका तयार होतो.
  4. भाजलेल्या कोयींच्या गराचे तुकडे करा. पातेल्यात जिरं,हिंग,मोहरीची फोडणी करा. त्यात गराचे तुकडे टाकून शिजवा. या भाजीचा तुम्ही पुरी किंवा चपातीबरोबर आस्वाद नक्कीच घेऊ शकता.
  5. शाकाहार्‍यांसोबतच मांसाहारीदेखील चिकन,मटण किंवा माश्याच्या कालवणामध्ये कोयींचा वापर करू शकतात.
  6. ओरिजनल रत्नागिरी-देवगड हापूस मोहोत्सव  2022 संपुर्ण महाराष्ट्र आंबा विक्री साठी कोणी इच्छुक असेल तर त्यांना थेट बागेतून आंबा उपलब्ध करून दिला जाईल,
  7. देवगड/रत्नागिरी हापूस च्या अपडेट मिळवण्या साठी,  9834409673 या नंबर वर whatsapp कराकिव्हा लिंक वर क्लिक करा https://wa.link/ykwcpq