उन्हाळा म्हटलं की प्रत्येकाला आंब्याची चाहूल लागते. हापूस आंबा असं म्हटलं तरी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. कोकणातील हापूस आंब्याची चव ही अतिशय अप्रतिम असते. पण अनेकदा हापूस आंब्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जाते. सध्या बाजारातील अनेक विक्रेते सामान्य हापूस म्हणून कोणताही आंबा ‘हापूस आंबा’ किंवा ‘अल्फोन्सो आंबा’ या नावाने विकतात. त्यामुळे खरा हापूस आंबा ओळखणे कठीण असते. (How to Identify Real Konkan Alphonso Hapus Mango)

हापूस आंब्याच्या चवीने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. त्यामुळे या फळाची चव इतर कोणत्याही आंब्याच्या प्रजातीला येत नाही. हापूस आंबा कोकणच्या मातीतील उत्पादन आहे. कोकणातील हापूस आंबा म्हणजे निसर्गाची किमया असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे कोकणाव्यक्तिरिक्त या फळाची इतर कुठेही लागवड केली, तर त्याला विशिष्ट चव येत नाही. म्हणूनच हापूस आंब्याला कोकणचा राजा म्हणून ओळखतात. बहुतांश घरात अक्षय तृतीयापासून आंबा खायला सुरुवात करतात.

🛑हापूस आंबा नेमका कसा ओळखालं?🛑

💠चांगल्या गुणवत्तेच्या हापूस आंब्याला एक नैसर्गिक सुंगध असतो. त्या सुंगधामुळे तो दूरवरुनही पटकन ओळखता येतो. नैसर्गिकरित्या गवताच्या अढीमध्ये पिकवलेल्या आंब्याच्या घमघमाट दूरपर्यंत पसरतो.

💠इतर भागातून येणारे आंबे जे हापूस आंब्यासारखे दिसतात मात्र त्याला अजिबात गंध नसतो किंवा फार क्वचित येतो. हे आंबे रासायनिक पद्धतीचा वापर करुन पिकवलेले असल्याने ते सुगंध देत नाहीत.

💠नैसर्गिकरित्या पिकवलेले आंब्यांना स्पर्श केल्यानंतर ते मऊ आणि मुलायम असल्याचे जाणवतात. तर रासायनिकरीत्या पिकलेले आंबे पिवळे, पण कठोर असतात.

💠नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा रंग हा पिवळसर आणि फिकट हिरवा असतो. तर रासायनिकरीत्या पिकलेले आंबे एकसारख्याच रंगाचे दिसतात. (How to Identify Real Konkan Alphonso Hapus Mango)आंबा

💠पिकलेल्या हापूस आंब्याची साल आपण सहजरित्या हाताने काढू शकतो. तसेच या सालीला आंब्याचा गर लागत नाही.

💠हापूस आंब्याचा वास आणि त्याचा केशरी गर यावरून सहजरित्या ओळखू शकतो.

💠एका मोठया भांड्यात पाणी घेऊन त्यात आंबा बुडवा, जर आंबा बुडाला तर तो नैसर्गिकरित्या पिकलेला आहे. मात्र जर आंबा तरंगत राहिला तर तो रसायने वापरुन पिकवलेला आहे, असेही काहीजण ओळखतात.

ओरिजनल रत्नागिरी-देवगड हापूस मोहोत्सव  2022 संपुर्ण महाराष्ट्र आंबा विक्री साठी कोणी इच्छुक असेल तर त्यांना थेट बागेतून आंबा उपलब्ध करून दिला जाईल,

देवगड/रत्नागिरी हापूस च्या अपडेट मिळवण्या साठी,  9834409673 या नंबर वर whatsapp कराकिव्हा लिंक वर क्लिक करा https://wa.link/ykwcpq