उन्हाळ्याला आता सुरूवात झाली आहे. त्यात हवामान खात्याकडून हीटवेव म्हणजेच उष्ण लाटेची चेतावणी देखील देण्यात आली होती. मागचे काही दिवस खूपच जास्त उष्णतेचे होते.
आता उष्णतेची लाट संपली असली तरी देखील मे महिना अजूनही यायचा बाकी आहे. 
त्यामुळे अशास्थितीत आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे. उन्हाळ्यात आपल्या शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी पाण्याची जास्त गरज भासते. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावं असा अनेक तज्ज्ञांकडून सांगण्यात येतं. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की शरीरासाठी कमी पाण्याइतकेच जास्त पाणी पिणं देखील धोक्याचं आहे. कारण जास्त पाणी पिणं देखील तुमच्यासाठी नुकसानकारक ठरु शकतं. त्यामुळे हे जाणून घ्या की, किती पाणी पिणं शरीरासाठी चांगलं आहे.

तुम्ही किती पाणी पिता?

पाणी पिण्याबद्दल लोक वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यानंतर, जेवताना, व्यायाम केल्यानंतर पाणी प्यावे असं म्हटलं जातं.

परंतु याबाबत तज्ञ काय म्हणतात हे समजून घेणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 6 ते 8 तासांच्या झोपेनंतर शरीराला पाण्याची गरज असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर आपल्या क्षमतेनुसार १ ते २ ग्लास पाणी पिऊ शकतो.

बहुतेक लोक जेवताना जास्त पाणी पितात. परंतु असे करणे टाळावे. जर अन्न गिळताना त्रास होत असेल, तर एक किंवा दोन घोट पाणी पिण्यास हरकत नाही. जेवण करताना जास्त पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते कारण तोंडात तयार होणारे एन्झाइम थेट पोटात जातात.

इतकंच नाही तर अनेकजण वर्कआऊट केल्यानंतर जास्त पाणी पितात. परंतु त्यावेळी जास्त पाणी न पिता 10-10 मिनिटांच्या अंतराने एक किंवा दोन घोट घेऊ शकता.

तज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीने दररोज सरासरी 2 ते 3 लीटर पाणी प्यावे, परंतु जास्त घाम आल्याने शरीरातील पाण्याची कमतरता होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिऊ शकता.

परंतु पाणी पिताना हे लक्षात ठेवा की एका श्वासात पाणी पिण्याऐवजी ते सिप करून प्या. यामुळे पचनशक्ती सुधारते.

पाणी कमी किंवा जास्त पिण्याचे तोटे

सुरुवातीला पाणी जास्त पिण्याचे तोटे जाणून घेऊया, बऱ्याच लोकांना असे वाटते की पाणी कमी प्यायल्याने त्रास होतो तर मग आपण जास्त पाणी पिऊयात. परंतु तुम्हाला माहितीय का? जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमची पातळी कमी होते. ज्यामुळे डोक्याला सूज येते. तसेच किडनीवर याला प्युरीफाय करण्यासाठी जास्त दबाव येतो. ज्यामुळे किडनी कमी होण्याचा प्रभाव जास्त आहे. तसेच जास्त पाणी प्यायल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे जेवण देखील जास्त जात नाही.

कमी पाणी पिण्याचे तोटे काय?

कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. ज्यामुळे वय देखील जास्त वाढलेलं दिसतं, ज्यामुळे चरबी देखील वाढते.