हिवाळ्यात वजन कमी करण्याचे उपाय –
– थंडीच्या काळात दिवसभर घरी बसू नये. वजन वाढत असेल तर घराबाहेर पडा. सकाळी थंडी अधिक असते, त्यामुळे तेव्हा फिरायला जाऊ नका. पण थंडी थोडी कमी झाली की, फेरफटका मारायला आवर्जून बाहेर पडा. थंडीच्या ऋतूत दिवसा किंवा संध्याकाळी 4 अथवा 5 वाजता चालणं उत्तम. यावेळी ऊनही असते. थंडीच्या दिवसात गार वाटल्याने देखील शरीरातील चरबी, कॅलरी देखील कमी होते, हे तुम्हाला माहीत आहे का? थंडीच्या दिवसातही कॅलरीज बर्न करायच्या असतील, तर घराबाहेर पडून चालणं गरजेचं आहे.
– हिवाळ्यात लोक घरी आळसात बसून खाण्या-पिण्याची वेळही पाळत नाहीत. काही लोक जास्त खायला लागतात. मात्र थंड हवामानातही शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल, तर खाण्यापिण्याची सवय सुधारणे गरजेचे आहे. त्यासाठी हेल्दी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करावं. तसेच वेळेवर जेवण्याची सवय लावावी. फायबरमुळे वजन लवकर वाढत नाही, कारण त्यामुळे आपलं पोट खूप वेळ भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे आपला कॅलरीयुक्त, अनहेल्दी पदार्थ खाण्यापासून बचाव होतो व वजन नियंत्रणात राहते.
– काही लोक हिवाळ्याच्या दिवसात गरम पाणी पितात. तुम्हालाही ही सवय असेल तर ती बदला. वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर थंडीच्या मोसमातही साधं पाणी प्यावं. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की शरीराच्या तापमानापेक्षा जास्त थंड पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला ते गरम करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. या काळात शरीरातून भरपूर कॅलरीज बर्न होतात. जर तुम्हाला गार पाणी पिणे शक्य नसेल तर साधं पाणी प्यावे. यामुळे सर्दी-खोकल्यापासूनही तुमचे संरक्षण होईल.
– हिवाळ्याच्या दिवसांत वजन कमी करायचं असेल तर हर्बल टी तसेच ब्लॅक कॉफीचे सेवन करावे. काही महिने दुधाचा चहा पिऊ नका. हर्बल टी आणि ब्लॅक कॉफीमुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. हर्बल टी मध्ये ग्रीन टी, लॉन्ग टी, हिबिस्कस टी, तसेच ब्लॅक कॉफी यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. थंडीच्या ऋतूत हेल्दी ड्रिंक्स जरूर प्यावेत. त्यामुळे शरीराचे मेटाबॉलिज्म वाढते, तसेच फॅट बर्न होण्यास मदत होते.
0 Comments