काकडी मध्ये अनेक पोषक घटक असतात. काकडीमध्ये जवळजवळ 96 टक्के पाणी असते.त्यामुळे डीहायड्रेशनची स्थिती उद्भवत नाही.

फायबर्सचा चांगला स्त्रोत 

काकडी मध्ये फायबर्सचे प्रमाण मुबलक असते. 1 कप काकडीतून 0.83 ग्रॅम इतके तंतुमय पदार्थ मिळतात. म्हणजे 1 कप काकडीतून 4 टक्के फायबर्सची दररोजची गरज भागवली जाते.

काकडीतील विटामिन्स

एक कप काकडीमध्ये विटमिन ‘ए’ चे प्रमाण 223.60 IU इतके असते. म्हणजे यामुळे विटामिन ‘ए’ ची 4.5 टक्के इतकी दैनिक गरज (RDA) भागवली जाते. काकडीमध्ये वाटामिन ‘ए’ मुबलक प्रमाणात असते. विटामिन ‘ए’ मुळे विविध कैन्सर होण्याचा धोका कमी होतो. तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी, पांढऱ्या पेशींच्या (WBC) निर्मीतीसाठी विटामिन ‘ए’ ची महत्वाची भुमिका असते.

तर एक कप काकडीतून 5.5 mg इतके विटामिन ‘सी’ मिळते. यामुळे विटामिन ‘सी’ ची 10 टक्के इतकी दैनिक गरज (RDA) एक कप काकडीतून भागवली जाते

तर काकडीमध्ये विटामिन ‘के’, ‘ई’ आणि ‘बी’ अल्प प्रमाणात असतात.

काकडीतील खनिजतत्वे 

काकडीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक, पोटॅशियम, फॉस्फरस, तांबे, मॅंगनीज यासारखे खनिजतत्वे असतात. 100 ग्रॅम काकडीतून 150 मिग्रॅ इतके पोटॅशियम मिळते.

काकडीमध्ये Molybdenum नावाचा एक प्रमुख असा पोषकघटक आढळतो. त्यात एन्टिऑक्सिडंट गुणधर्म आढळतो त्यामुळे कॅन्सर पासून रक्षण होते. तसेच या पोषक तत्वामुळे चेतासंस्था आणि किडनीचे कार्य योग्य प्रकारे होण्यास मदत होते.

वजन कमी करणाऱ्यांसाठी काकडी एक चांगला पर्याय 

तंतुमय पदार्थ आणि पाणी ह्या घटकांनी काकडीयुक्त असते. एक कप काकडीतून फक्त 16 कॅलरीज मिळत असतात. त्यामुळे लो कॅलरीज काकडीचा समावेश आहारात करुन वजन आटोक्यात ठेवता येते. काकडी खाताना सालीसकट खावी त्यामुळे काकडीतील पोषकतत्वांचा आपणास फायदा होईल.