वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्याप्रमाणेच मानेवर देखील सुरकुत्या येतात. बदलेली जीवनशैली आणि वृद्धत्वाच्या लक्षणांमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण होतात. या सुरकुत्या तुमच्या चेहऱ्यावर येणं ही सामान्य गोष्ट आहे पण मनेवर आलेल्या सुरकुत्या समस्या बनतात. योग्य वेळी जर आपण त्वचेची काळजी घेतली तर या सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.

वाढत्या वयानुसार मानेवर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी 'हे' ५ उपाय वापरुन बघाच, लगेच परिणाम दिसेल

वयानुसार चेहऱ्यावर सुरुकुत्या येणं ही सामान्य गोष्ट आहे. पण बदललेल्या जीवनशैलीमुळे या सुरुकुत्या वयाच्या आधीच येण्याची सुरुवात झाली आहे. त्वचेला योग्य पोषण, हायड्रेशन आणि संरक्षण न मिळाल्यास या त्वचेवर या सुरकुत्या निर्माण होतात.

मानेची त्वचा देखील चेहऱ्याप्रमाणेच नाजूक असते. पण या सुरकुत्या दिसायला चांगल्या दिसत नाहीत पण घरच्या घरी काही उपाय करुन या सुरकुत्यांवर उपाय मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

कलोंजी तेल

कलोंजी तेलाचे अनेक उपाय आहेत. त्वचेचे सरक्षण करण्यासाठी तुम्ही कलोंजीच्या तेलाचा वापर करु शकता. या तेलामध्ये फॅटी अॅसिड असते यामुळे त्वचेला मॉइश्चरायझ होण्यासाठी मदत होते. हा पॅक तयार करण्यासाठी तुम्ही एक चमचा ऑलिव्ह तेल आणि अर्धा चमचा कलोंजी तेल टाकून या मिश्रणाने मानेची १५ मिनीटे मालिश करा.

अंड्याचा वापर

मानेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही अंड्याचा पांढऱ्या भागाचा वापर करु शकता. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, अल्ब्युमिन असतात जे त्वचेवर टोनिंगचे काम करते. हा पॅक तयार करण्यासाठी एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग काढून त्यात २ टेबलस्पून मध, ग्लिसरीन आणि गुलाबजल मिक्स करुन हे मिश्रण २० मिनिटे तरी मानेला लावून ठेवावे.

ऍपल सायडर व्हिनेगरचा वापर

ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे मानेवरील सुरकुत्या कमी होतात. ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये अल्फा हायड्रॉक्सिल ऍसिड देखील असते जे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. ते वापरण्यासाठी, तुम्ही एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर आणि एक चमचा मध घ्या आणि दोन्ही मिक्स करून पेस्ट बनवा. 15 मिनिटे ही पेस्ट मानेवर लावा आणि नंतर पाण्याने स्वच्छ करा.

तांदळाच्या पिठाचा वापर

तांदळाचे पिठ सर्वांच्याच घरात मिळते. तांदळाच्या पिठामुळे देखील मानेवरील सुरकुत्या कमी होणयास मदत होते. हा पॅक बनवण्यासाठी गुलाब पाणी आणि तांदळाचे पीठ चांगले मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. आता याने मानेला मसाज करा. 10 मिनिटांनंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करु शकता.

मसूरचा वापर

तुमच्या त्वचेवर निर्माण झालेल्या या सुरकुत्या मसूरच्या वापरामुळे देखील काढू शकता. यासाठी अर्धी वाटी मसूर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी गाळून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता या पेस्टमध्ये टोमॅटोचा रस घालून पेस्ट बनवा आणि मानेवर लावा. यामुळे मानेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.