जसेजसे आपले वय वाढण्यास सुरूवात होते तसे आपल्या त्वचेमध्ये अनेक बदल होतात.

यामुळे वाढत्या वयामध्ये आपण आपल्या त्वचेवर (Skin) अधिक लक्ष देणे महत्वाचे ठरते. 40 शी ओलांडल्यानंतर महिलांना त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. पण जर तुम्हाला 40 नंतरही सुंदर आणि तजेलदार त्वचा हवी असेल तर काही ब्युटी टिप्स (Beauty tips) फाॅलो करा आणि आपली त्वचा चांगली ठेवा. या टिप्स नेमक्या कोणत्या आणि त्या कशापध्दतीने फाॅलो करायच्या याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

हायड्रेशनची काळजी घ्या

आहारापासून क्रीमपर्यंत हायड्रेशन घटकाची काळजी घ्या. 40 नंतर त्वचेला हायड्रेट ठेवणे प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत पुरेसे पाणी प्या. यासोबतच हिरव्या भाज्या आणि फळे खा. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. नुसते पाणी पिऊनच चालणार नाहीतर आपल्याला आपल्या आहारामध्ये फळांच्या रसाचा देखील समावेश करावा लागेल.

व्यायाम करा

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, व्यायाम करणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. व्यायाम करून आपण आरोग्याच्या अनेक समस्या दूर ठेऊ शकतो. वयाची चाळीशी ओलांडताच व्यायामाला जीवनाचा एक भाग बनवा. व्यायाम आणि योगासने केवळ तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यासाठीच आवश्यक नाहीत तर शरीरात जमा झालेली चरबी बर्न करून चेहऱ्यावर चमक आणण्यास मदत करतात.

फेस मास्क नक्की वापरा

सनस्क्रीन त्वचेला लावल्याशिवाय अजिबात घराच्या बाहेर पडू नका. सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे चेहऱ्याचा रंग खराब होतो. जर तुम्ही फाउंडेशन लावले तर त्यात SPF असणे गरजेचे आहे. शक्यतो हायड्रेशनसाठी नेहमी फेस मास्क वापरा. तुम्ही सहज हायड्रेशन मास्क खरेदी करू शकता, ज्यामध्ये त्वचेचे पोषण करणारे घटक असतात तसेच त्वचा तजेलदार आणि चमकदार देखील करण्यास मदत करते.