Mango हे चवीला खूप गोड आणि रसयुक्त फळ आहे. आंब्याला फळाचा राजा असे म्हटले जाते. हे आपल्याला लहानपानसुनच माहिती आहे . ह्यात बरीच खनिजे, जीवनसत्वे आणि अँटिऑक्सिडेन्ट आहेत. जी आपल्याला निरोगी ठेवण्यास फायदेशीर आहे .

आंबा हे आपल्या भारताचे  राष्ट्रीय फळ देखील आहे. तसेच फिलिपिन्स आणि पाकिस्तान ह्या देशांचे देखील राष्ट्रीय  फळ आंबा आहे . आंब्याचे झाड हे खूप मोठे असते त्याची उंची साधरणतः ३० ते ९० फूट पर्यंत असते. आंब्याचे उत्पादन भारता व्यतिरिक्त इतर देशांमध्ये हि घेतले जाते जसे की ब्राझील मेक्सिको सोमालिया इतर अनेक देशांमध्ये ही घेतले जाते. 

आंबा खाण्याचे फायदे

1 .डोळ्यांसाठी फायदेशीर (Good For Healthy Eyes) :

Mango फळ व्हिटॅमिन ए चा भरपूर मोठा स्रोत आहे. ह्या फळात बीटाकॅरोटिन आणि व्हिटॅमिन ए हे व्हिटॅमिनस आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर  आहे. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे आपल्याला आंधळेपणा येऊ शकतो त्यामुळे  व्हिटॅमिन ए  हे आपल्या डोळ्यांचे आरोग्य  व दृष्टी सुधारणायचे काम करते.

 2. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते (Immunity Booster) :

 आंबा फळ हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी  आवश्यक असा जीवनसत्व असणारा समृद्ध स्रोत आहे. ह्या फळात  व्हिटॅमिन सी असल्यामुळे या पौष्टिकतेमध्ये अँटिऑक्सिडेंटचे  चे गुणधर्म असतात.  जे आपली रोग प्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात. आंब्यावर केलेल्या रिसर्च नुसार असे लक्षात आले आहे कि Mango हा एक बीट कॅरोटीन समृद्ध स्रोत आहे त्यात असणाऱ्या कॅरोटिनॉइड मुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.

3. हृदयविकार (Good For Healthy Heart) :

 आपल्या आहारात आंब्याचा Mangoसमावेश  केल्यास आपल्या शरीराची चरबी कमी होते. तसेच आपल्या शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यास मदत होते. ह्या  फळात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा धोका कमी होतो.

4. केसांसाठी फायदेशीर (Healthy Hair) :

 आंबा फळात व्हिटॅमिन सी चे प्रमाण आढळते . त्यामुळे त्याचा उपयोग आपल्या केसांसाठी होतो आपले केस कोरडे बारीक आणि निर्जीव  ठेवण्यास मदत करतो. आंब्याच्या फोडीपासून  तयार केलेले तेल केसांना लावले तर केस गळणे कमी होतात व केस लवकर पांढरे होत नाही. Mango फळात  व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे केसाची  वाढ होते आणि  केस मजबूत होतात.  

5. त्वचेसाठी फायदेशीर(Healthy For Skin)

 आपल्या त्वचेसाठी देखील Mango आंबा फळ खूप फायदेशीर आहे . त्वचेवर लावल्याने बंद झालेली छिद्रे उघडतात  त्यामुळे आपली त्वचा साफ व चमकदार होते .त्याचा नियमित सेवन केल्याने त्वचा मऊ होते व आपल्या स्किन वरील वयाचा प्रभाव कमी दिसु लागतो. Mango खाल्याने आपली भूक देखील वाढते . घरगुती उपाय म्हणून आपण आंब्याचा स्क्रब देखील बनवू शकतो . चार चमचा दूध थोडीशी साखर आणि थोडासा आंब्याचा लगदा मिक्स करुन चेहऱ्यावर १० मिनिट लावला आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा त्यानंतर लगेच आपल्या स्किन वर होणार परिणाम आपल्याला दिसून येईल .  

6.पोटासाठी फायदेशीर (Healthy Stomach)

Mango(आंबा) फळाचे सिजनमध्ये आपण आम्ररसावर खूप ताव मारतो  त्यामुळे काहींचे पोट बिघडते त्यासाठी त्यावर उत्तम  घरगुती उपाय म्हणजे आंब्याच्या कोयीतील गर चावून खाल्यावर अजीर्णपणा ,पोट दुखणे जुलाब  होणे  थांबते ह्या सगळयांवर हा  एक घरगुती रामबाण उपाय आहे . पोटात होणाऱ्या कृमींवर आंब्याच्या कोयीचे चूर्ण फायदेशीर औषध बानू शकते . जर आपले हात  पाय मुरगळले असतील  लचकले असतील किंवा आपल्या हात पायांना सूज आली असेल तर आंबा फळाचा कोई चा चूर्ण आपण दाट  लेप म्हणून सुद्धा लावू शकतो . 

7. स्मरणशक्ती वाढवते (Memory increase) :
ज्या लोकांना सतत विसरायची सवय असते. त्या लोकांसाठी Mango आंब्याचा सेवन करणे फायदेशीर आहे. आंब्यामध्ये ग्लुटामिन ऍसिड नावाचा एक पौष्टिक तत्व आहे जे आपली स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्याचप्रकारे आपल्या शरीरातील रक्तपेशी (Blood Cells) वाढवण्यास देखील मदत करतात. गरोदर स्त्रियांसाठी आंबा फळ खाणे अतिशय फायदेशीर आहे.

ओरिजनल रत्नागिरी-देवगड हापूस मोहोत्सव  2022 संपुर्ण महाराष्ट्र आंबा विक्री साठी कोणी इच्छुक असेल तर त्यांना थेट बागेतून आंबा उपलब्ध करून दिला जाईल,

देवगड/रत्नागिरी हापूस च्या अपडेट मिळवण्या साठी,  9834409673 या नंबर वर whatsapp कराकिव्हा लिंक वर क्लिक करा https://wa.link/ykwcpq