केवळ आंबे खायला मिळणार म्हणून प्रत्येक जण उन्हाळ्याची वाट पाहत असतात. अन्यथा जीवघेणा उकाडा सहन करायला कोणालाही आवडत नाही. या पृथ्वीवर क्वचितच एखादी व्यक्ती अशी आढळेल की जिला/ज्याला आंबा खाणं पसंत नाही. तर काही जण मुरुम, उष्णता, पुरळ, डाएटिंगमुळे आंबे खाणे टाळतात.

पण मर्यादित स्वरुपात आंब्यांचे सेवन केलं तर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत, हे लक्षात घ्या. आंब्यामुळे सौंदर्य लाभ असंख्य मिळू शकतात. या लेखाद्वारे आपण आंब्याचे फेस पॅक (Mango Face Pack) तयार करण्याची पद्धत जाणून घेणार आहोत. या फेस पॅकद्वारे तुमच्या त्वचेचं सौंदर्य खुलण्यास मदत मिळेल.

टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी आंब्याचे फेस पॅक

उन्हाळ्यामध्ये त्वचा काळवंडणे ही सामान्य समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आपण आंब्याचे फेस पॅक वापरू शकता. फेस पॅक तयार करण्यासाठी लागणारी सामग्री

  • दोन चमचे मँगो पल्प
  • चिमूटभर हळद
  • एक चमचा गव्हाचे पीठ

वरील सर्व सामग्री वाटीमध्ये एकत्रित घ्या व पेस्ट तयार करा. चेहरा व मानेवर २५ मिनिटे फेस पॅक लावा.


​त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी पॅक

चेहऱ्यावरील डेड स्किनची समस्या दूर करण्यासाठी आंब्याचा वापर करून आपण शानदार एक्सफोलिएटर तयार करू शकता. यासाठी लागणारी सामग्री

  • दोन चमचे मँगो पल्प
  • एक चमचा तांदळाचे पीठ
  • एक चमचा बदाम पावडर

तांदळाचे पीठ आणि बदामाची पावडर उपलब्ध नसल्यास आपण ४ बदाम व एक चमचा तांदुळ मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटा. ही पावडर मँगो पल्पमध्ये मिक्स करून एक्सफोलिएटर तयार करून घ्या.

​असा करा एक्सफोलिएटरचा उपयोग

एक्सफोलिएटर त्वचेवर १० मिनिटांसाठी लावा. यानंतर हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करा आणि थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. याद्वारे त्वचेचं सौदर्य खुलण्यास मदत मिळेल.

​चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी उपाय

आपल्या त्वचेवरील चमक नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी देखील आंब्याचा उपयोग करू शकता. यासाठी तुम्हाला ही खास पेस्ट तयार करावी लागेल.

  • आंब्याचा पल्प - दोन चमचे
  • एक चमचा मलई
  • एक चमचा बेसन

वरील सर्व सामग्री वाटीमध्ये एकत्रित घ्या व नीट मिक्स करा. ही पेस्ट २० ते २५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या. या मिश्रणातील पोषण तत्त्वांमुळे त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळेल.

आंबा खाल्ल्याने त्वचेला मिळतील अधिक लाभ

उन्हाळ्यामध्ये आंब्याचे सेवन करणं आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतं. पण यासाठी मर्यादित स्वरुपातच आंबा खाणे आवश्यक आहे. आंब्याच्या सेवनामुळे त्वचा नैसर्गिक स्वरुपात उजळण्यास मदत मिळू शकते. केवळ आंबा खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जेवणासोबत आंबा खाल्ला तर शरीरास नुकसान पोहोचत नाही. पण खबरदारी म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

त्वचेला मिळतात पोषक घटक

आंब्यामध्ये कॅरोटिनॉइड्स आणि व्हिटॅमिन ‘ए’ सह कित्येक पोषण तत्त्वांचा समावेश असतो. हे घटक त्वचेसाठी लाभदायक असतात आणि यामुळे त्वचा नैसर्गिक स्वरुपात उजळण्यास मदत मिळते. तसंच कैरीचे पन्हे, कैरीची चटणी आणि कैरीचे लोणच्याचे सेवन करू शकता. पण या सर्व पदार्थांचे योग्य प्रमाणातच सेवन करणं आवश्यक आहे.
ओरिजनल रत्नागिरी-देवगड हापूस मोहोत्सव  2022 संपुर्ण महाराष्ट्र आंबा विक्री साठी कोणी इच्छुक असेल तर त्यांना थेट बागेतून आंबा उपलब्ध करून दिला जाईल,

देवगड/रत्नागिरी हापूस च्या अपडेट मिळवण्या साठी,  9834409673 या नंबर वर whatsapp कराकिव्हा लिंक वर क्लिक करा https://wa.link/ykwcpq