हापूसच्या नुसत्या नावानेच सगळ्यांना भुरळ पडते. त्यामुळे विक्रेत्याने हापूस आंबा आहे, असे म्हटले की ग्राहकांची पावले तिकडे वळतात. पण बऱ्याचवेळा हापूसच्या नावाने इतर कोणतातरी आंबा ग्राहकांच्या माथी मारला जातो.उन्हाळा म्हणजे आंब्याची सिझन आणि आंब्याचा सिझन म्हणजे हापूस हे समीकरणच तयार झाले आहे. लहानथोरांपासून प्रत्येकालाच हापूसच्या गोडीची ओढ असते. रत्नागिरीचा हापूस घ्यायचा कि देवगडचा हापूस आंबा, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. हापूस जसा चवीचा राजा असतो तसा तो किंमतीचाही राजा असतो. 

इतर आंब्यांच्या तुलनेत हापूसची किंमत जास्त असते. परंतु तरीही या आंब्यांच्या राजाची आतुरतेने वाट पाहिली जाते. अलीकडच्या काळात गल्लीबोळात हापूसच्या नावाने इतर कोणताही आंबा विकण्याची पद्धत झाली आहे. (How to Identify Original Konkan Hapus Mango)

हापूसच्या नुसत्या नावानेच सगळ्यांना भुरळ पडते. त्यामुळे विक्रेत्याने हापूस आंबा आहे, असे म्हटले की ग्राहकांची पावले तिकडे वळतात. पण बऱ्याचवेळा हापूसच्या नावाने इतर कोणतातरी आंबा ग्राहकांच्या माथी मारला जातो. त्यामुळे हापूस आंबा नेमका कसा ओळखायचा हा दर उन्हाळ्यात पडणारा प्रश्न असतो. एकीकडे हापूसची किंमत तर दुसरीकडे हापूसच्या गोडीची ओढ असते. कोकणी माणसाप्रमाणेच हापूसमध्ये एक वेगळाच गोडवा असतो. हापूस फक्त कोकणातच येतो. कारण कोकणची माती, तिथले हवामान हे हापूससाठी योग्य आणि पोषक असते. जसे सफरचंद ही काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये येतात तसेच.

हापूस ओळखण्याची सूत्रे, खरा हापूस कसा ओळखायचा?

  1. हापूस आंब्याचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्याचा सुगंध. हापूस आंब्याला एक नैसर्गिक सुंगध असतो आणि त्याचा घमघमाट हा सर्व खोलीभर पसरतो.
  2. हल्ली आंबा कृत्रिम पद्धतीने म्हणजेच रसायनांचा वापर करून पिकवतात. नैसर्गिकरित्या पिकलेला हापूस आंबा मऊ आणि नरम असतो तर कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा कडक असतो.
  3. कृत्रिमरित्या पिकवलेल्या हापूसचा रंग एकसारखाच असतो. तर नैसर्गिकरित्या पिकलेला हापूस पिवळसर आणि फिकट हिरव्या रंगाचा असतो. कारण तो आंबा हळूहळू पिकलेला असतो.
  4. हापूस आंब्याची साल सहज काढता येते, त्याला गर लागत नाही. कारण तो नैसर्गिकरित्या पिकलेला असतो.
  5. हापूसचा सुगंध आणि त्याचा गर ही त्याची उत्तम ओळख आहे.
  6. खरा हापूस ओळखण्याचे एक घरगुती तंत्र आहे. ते म्हणजे एका भांड्यात किंवा पातेल्यात पाणी घ्या आणि त्यात आंबा टाका. नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा त्यात बुडतो त्याउलट कृत्रिमरित्या पिकलेला आंबा पाण्यावर तरंगतो. 
  7. तुम्ही जर खरोखरच आंब्याचे पारखी आणि खवय्ये असाल तर अनेक वर्षांच्या अनुभवातून तुमची नजर तयार झालेली असते. त्यामुळे फक्त आंब्यावरून टाकलेली एक पारखी नजरदेखील तुम्हाला हापूसची ओळख पटवू शकते.

 तर यंदाच्या मोसमात खरा हापूस ओळखा आणि त्याचा मनसोक्त आनंद घ्या. शेवटी आंबा म्हटला की हापूसच हवा. अलीकडच्या काळात मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यासोबत आंबा पार्टी करण्याचेही प्रमाण वाढले आहे. अनेकजळ गावाकडे शेतात किंवा कोकणातील वाड्यांमध्ये जाऊन हापूस आंब्याचा मनसोक्त आनंद घेतात. परंतु सर्वानाच हे शक्य होते असे नाही. तुम्ही घरच्या घरीसुद्धा हापूसचा आनंद घेऊ शकता. त्यासाठीच खरा हापूस ओळखण्याची ही सूत्रे लक्षात ठेवा.

ओरिजनल रत्नागिरी-देवगड हापूस मोहोत्सव  2022 संपुर्ण महाराष्ट्र आंबा विक्री साठी कोणी इच्छुक असेल तर त्यांना थेट बागेतून आंबा उपलब्ध करून दिला जाईल,

देवगड/रत्नागिरी हापूस च्या अपडेट मिळवण्या साठी,  9834409673 या नंबर वर whatsapp कराकिव्हा लिंक वर क्लिक करा https://wa.link/ykwcpq