Diabetes Diet | मधुमेह (Diabetes) हा एक असा आजार आहे ज्यामध्ये आहाराची काळजी घेतली नाही तर ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वाढू शकते.मधुमेह आटोक्यात ठेवला नाही तर अनेक आजार होऊ शकतात. सायलेंट किलर म्हणून ओळखल्या जाणार्‍या या आजाराचा परिणाम हृदय (Heart), डोळे (Eyes) आणि किडनीवरही (Kidney) दिसून येतो (Diabetes Diet).

खराब जीवनशैली (Unhealthy Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे या आजाराने तरुण वयातच लोकांना आपले बळी बनवले आहे. लहान मुलेही आता या आजाराला बळी पडत आहेत.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी मैद्याच्या (Flour) सेवनाने साखरेची पातळी (Sugar Level) वाढू शकते. मैद्याने बनवलेले पदार्थ, जसे की व्हाईट ब्रेड (White Bread), पास्ता (Pasta) आणि इतर पिष्टमय पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण (Carbohydrates Level) जास्त असते, ज्यामुळे ब्लड शुगरची लेव्हल वाढते (Diabetes Diet).

मैद्याचे सेवन हानिकारक कसे आहे (Refined Flour Bad For Your Health)
मैदा हा गव्हाच्या पिठाचा (Wheat Flour) सर्वात रिफाईंड प्रकार आहे. मैदा बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया अशी आहे की यात अनेक आवश्यक पोषकतत्वे (Nutrients) नष्ट होतात. ब्लीच (Bleach) आणि रसायनांमुळे (Chemical) त्याचा रंग पांढरा आहे. मैद्यातील ब्लिचिंग एजंट मधुमेहाच्या रुग्णांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.

जेव्हा मैदा तयार केला जातो तेव्हा गव्हातून सुमारे 97 टक्के फायबर नष्ट होते आणि त्यामुळे मैद्याच्या पिठाचे पौष्टिक मूल्य कमी होते जे शुगरच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे.

पांढर्‍या पदार्थांचे करा मर्यादित सेवन (Avoid White Foods) :
ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी आहारात साखर (Sugar), आटा, मैदा असे पांढरे पदार्थ घेणे कमी करावे.
मधुमेहाच्या रुग्णांनी कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आणि पोषक तत्वे कमी असलेले पांढरे पदार्थ सेवन करू नयेत.

भातापासून दूर राहा (Stay Away From Rice) :
पांढर्‍या तांदळाचे (White Rice) सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते.
तांदळाच्या उच्च ग्लायसेमिक इंडेक्समुळे (High Glycemic Index) मधुमेहाच्या रुग्णांची साखरेची पातळी वाढू शकते.

पास्ताही टाळा (Avoid Pasta) :
पास्ताचे (Pasta) अतिसेवन केवळ मधुमेही रुग्णांनाच हानी पोहोचवू शकत नाही तर निरोगी व्यक्तीलाही मधुमेहाचा बळी बनवू शकते.
पास्ता बनवण्यासाठी सॉस (Sauce), क्रीम (Cream) आणि चीज (Cheese) वापरतात, या सर्व गोष्टी ब्लड शुगर लेव्हल वाढवण्यास कारणीभूत असतात.