आपल्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीराच्या योग्य विकासासाठी पौष्टिक आहार घेणं खूपच आवश्यक आहे.
शरीराच्या विकासासाठी अ जीवनसत्व आवश्यक
आपल्या शरीराच्या वाढीसाठी अ जीवनसत्व आवश्यक असते. व्हिटॅमिन-ए डोळे, त्वचा आणि दातांसाठी फायदेशीर मानले जाते. गाजर, संत्री आणि रताळे यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळते.
व्हिटॅमिन बीचा आहारात करा समावेश
शरीराच्या विकासासाठी व्हिटॅमिन-बी खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही याचा आहारात समावेश केलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमची एनर्जी वाढवण्यापासून ते शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यापर्यंत व्हिटॅमिन-बी महत्त्वाची भूमिका बजावते. केळी, मसूर, मिरची, बीन्स आणि यीस्टमध्ये व्हिटॅमिन बी आढळते.
व्हिटॅमिन सी देखील महत्त्वाचे
व्हिटॅमिन-सी देखील आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन-सी शरीरातील लोहाची कमतरता भरुन काढते. सोबतच रक्तवाहिन्या मजबूत होतात. व्हिटॅमिन-सी सामान्यतः पेरू, लाल आणि हिरवी मिरची, किवी, संत्रा, द्राक्षे, स्ट्रॉबेरी इत्यादींमध्ये आढळते.
0 Comments