Child’s Nutrition Tips | कोविड-19 महामारीमुळे (Covid-19 Pandemic) सर्व शाळा (Schools), महाविद्यालये
(Colleges) आणि कार्यालये (Offices) बंद ठेवावी लागली.


कोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा

त्यामुळे लोकांच्या जीवनशैलीत (Lifestyle) अनेक बदल झाले आहेत. लॉकडाऊनमुळे
रोजच्या सवयी बदलल्या आहेत, मग ती जीवनशैली असो वा आहार. यातील अनेक सवयी चांगल्या होत्या पण मुलांच्या आरोग्यासाठी (Child’s
Nutrition Tips) त्या हानिकारक ठरल्या.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

कोविडची प्रकरणे (Covid Cases) आता कमी होत असताना, जवळपास दोन वर्षांपासून शाळा सुरू होणे हा केवळ मुलांसाठीच नाही तर
पालकांसाठीही भावनिक क्षण असेल. म्हणूनच आपण आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी तयार करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून त्यांना या बदलाशी
जुळवून (Child’s Nutrition Tips) घेणे सोपे जाईल.

आहार आणि जीवनशैलीच्या सवयी बदलणे (Changing Diet and Lifestyle Habits)

तुम्ही तुमच्या मुलाला पुन्हा शाळेसाठी कसे तयार करू शकता ते जाणून घेवूयात (Let us know how you can prepare your Child for School again) :

1. नाश्ता वगळू नका (Don’t Skip Breakfast)

कोविड लॉकडाऊनच्या (Covid Lockdown) काळात मुलांच्या झोपेची वेळ (Children’s Sleep Time) तर बिघडलीच त्याचबरोबर आहारही (Diet) बिघडला. शाळा आता पुन्हा सुरू झाल्या आहेत, म्हणजे जुन्या रुटीनला जाणे, वेळेवर उठणे आणि वेळेवर जेवण करणे. कधी कधी उशीरा उठल्यामुळे नाश्ता चुकतो. म्हणजे आवश्यक पोषण (Nutrition) मिळत नाही. शाळेत जाणार्‍या मुलांना दिवसभर ऊर्जेची (Energy) गरज असते, त्यामुळे त्यांना नाश्ता (Breakfast) आवश्य द्या.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

2. स्नॅक्ससाठी योग्य पदार्थ निवडा (Choose Healthy Snacks)

मुलांसाठी योग्य नाश्ता निवडा जेणेकरून त्यांची भूक भागेल. यामुळे बालपणाशी संबंधित लठ्ठपणासारख्या (Obesity) आरोग्याच्या समस्या (Health Problems) टळतील. यामुळे मुलांमध्ये सकस आहाराची (Healthy Diet) सवयही रुजते.

3. रात्री झोपण्याची वेळ बदला (Change Bedtime at Night)

आता तो काळ गेला आहे जेव्हा रात्री उशिरापर्यंत जागे राहता येत होते. आता जुनी दिनचर्या फॉलो करण्याची आणि स्क्रीन टाइम (Screen Time) कमी करण्याची वेळ आली आहे. रात्री वेळेवर झोपा जेणेकरून सकाळी लवकर उठता येईल. यामुळे दुसर्‍या दिवशी मूल उर्जावान राहिल.

4. घाई करू नका (Don’t Rush)

दोन वर्षांपासून घरातूनच शाळा अ‍ॅटेंड करण्याने मुलांमध्ये बदल घडून आले आहेत, अनेक वाईट सवयी निर्माण झाल्या आहेत आणि हे बदल एका रात्रीत होणार नाहीत. म्हणूनच हे महत्वाचे आहे की तुम्ही धीर धरा आणि मुलांना त्यांच्या गतीने हे बदल स्वीकारू द्या. जर तुम्ही घाई केली तर मुलांमध्ये भिती (Fear) निर्माण होईल.5. मुलांशी बोला (Talk to The Kids)

संभाषण (Conversation) ही मुख्य गोष्ट आहे आणि हे अनेक पातळ्यांवर खरे आहे. दोन वर्षांनंतर शाळा पुन्हा सुरू (School Reopen) झाल्या आहेत, ज्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर (Mental Health) मोठा परिणाम होऊ शकतो. अनेक वेळा मुलांना त्यांचे मत मांडता येत नाही किंवा त्यांच्यासाठी ते अवघड असते.

पण त्याचा त्यांच्या मनावर परिणाम होतो आणि मग ते चिडचिड (Irritability), निराशा (Disappointment), राग (Anger) इत्यादीद्वारे बाहेर पडतो. म्हणूनच मुलांशी बोलणे, त्यांना त्यांच्या शाळेबद्दल विचारा, ते या बदलाला कसे तोंड देत आहेत याबद्दल बोला.