आपले शरीर मजबूत व तंदुरुस्त राखण्यासाठी जसे अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे शरीराच्या जडण घडणीसाठी काही स्निग्ध पदार्थांची देखील गरज असते.आपले आयुर्वेदिक शास्त्र ( Ayurvedic science ) हे संपन्न असे शास्त्र आहे.
नेहमी तेलाचा वापर केल्याने आपल्या शरीराला अनेक पोषक तत्व प्राप्त होतात. या पोषक तत्वाच्या साह्याने आपली त्वचा कोरडी झाली असेल तर ती मऊ -कोमल मुलायम बनते तसेच शरीरावर कोणत्याही प्रकारचे त्वचाविकारही झाला असेल तर तो सुद्धा दूर होतो, चला तर मग जाणून घेऊया या तेलांमुळे आपल्याला आरोग्याचे (health benefits) कोण कोणते लाभ होतात त्याबद्दल..
- लव्हेंडर तेल : लव्हेंडर तेलामध्ये अँटी सेप्टिक गुणधर्म असतात.या तेलात अँटी बॅक्टेरियल गुणधर्म सुद्धा असतात. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन झाले असेल तर ते दूर करण्याची शक्ती या तेलात असते. जर तुम्हाला चटका लागला असेल अशावेळी भाजलेल्या जागेवर हे तेल लावल्यास आपल्याला जळण होत नाही. या तेलाचा वापर केल्याने ज्या ठिकाणी भाजले आहे अशा ठिकाणी फोड सुद्धा येत नाही. आंघोळ करतेवेळी पाण्यामध्ये जर आपण या तेलाचे दोन ते तीन थेंब टाकल्यास आपल्याला मानसिक शांतता मिळते व संपूर्ण तणाव निघून जातो.
- निलगिरी तेल : निलगिरीचे पान,फळ, साल मानवी शरीरासाठी उपयोगी मानण्यात आलेले आहे. या निलगिरीच्या पानांपासून तेलाची निर्मिती देखील केली जाते. निलगिरीच्या तेलामध्ये उष्णता गुणधर्म प्रदान करण्याची शक्ती असते. तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला, श्वास घेण्यात अडथळा निर्माण होत असेल, छातीमध्ये कफ साचलेला असेल तर अशा व्यक्तींसाठी निलगिरीचे तेल लाभदायी ठरते. या तेलाचे दोन थेंब आपण पाण्यामध्ये टाकून या पाण्याने वाफ घेतल्यास बंद झालेले नाक मोकळे होते व तुमची सर्दी लगेच पळून जाते.
- पुदिना तेल : जर तुम्हाला डोकेदुखी वारंवार त्रास देत असेल तर अशा वेळी आपण कोणत्याही तेलामध्ये पुदिना तेलाचे दोन थेंब टाकून हे तेल कपाळास लावल्यास आपल्याला फरक जाणवतो.या तेलाने हलका मसाज केला तरी डोकेदुखी पळून जाते.सूज, मांस पेशी वेदना , मांस पेशी आखडणे यासारख्या समस्या देखील दूर होतात.
- लिंबाचे तेल : लिंबाचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप सारे फायदे सांगण्यात आलेले आहे. लिंबू मध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी ची मात्रा उपलब्ध असते. लिंबूचे आपण अनेकदा लोणचे देखील खातो परंतु लिंबू द्वारे बनवले गेलेले तेल सुद्धा आपल्या शरीरासाठी गुणकारी ठरते. लिंबूच्या तेलामध्ये अँटीमायक्रोबियल एजंट असतात. जे आपल्याला तणावातून मुक्त करण्यास मदत करतात. या तेलाचेवएक ते दोन थेंब सेवन केल्यास आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. आपली त्वचा मॉइश्चराइज करण्यासाठी व नैसर्गिक चमक मिळण्यासाठी हे तेल मदत करते.
- चहा पत्तीचे तेल : चहा पत्तीच्या तेलामध्ये अँटी बॅक्टरियल घटक असतात. जर शरीरावर खाज,फोड्या,जखम झाली असेल,एखादा कीटक चावला असेल,उन्हात चेहरा काळा पडला असेल,खरूज, नायटा झाला असेल तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हे तेल लाभदायक ठरते.
0 Comments