आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक घटकांची आवश्यकता भासत असते. विविध पदार्थांचा आहारात समावेश केल्याने यातून आपल्याला मिनिरल्स, व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शियम आदी तत्व मिळत असतात.
हे पदार्थ खा आणि रक्तातील लोहाची कमतरता दूर करा
- अंड्याचा बलक : या नाश्त्यातून प्रथिनेच नाही तर भरपूर प्रमाणात लोह मिळत असते. अंड्यातील पिवळ्या बलकात सुमारे 1.89 मिलीग्राम लोह असते. त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होत असते. शिवाय यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
- ब्रोकोली : ब्रोकोली लोहाचा चांगला स्रोत आहे. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, ओमेगा 3, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम आणि फॉस्फरस यांसारखे काही इतर आवश्यक पोषक घटक असतात. ही भाजी हृदयासाठीही चांगली आहे. खराब कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करत असते. यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. यामुळे आपली पचनसंस्था निरोगी राहते. बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात.
- हरभरा : हरभरा हा खनिजांनी परिपूर्ण आहे. वजन नियंत्रित ठेवण्यास याची मोठी मदत होत असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्याने अनेक आजार दूर होतात. याचा रोज सॅलेडमध्ये वापर होउ शकतो.
- पालक : पालकाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. युएसडीए डेटानुसार, सुमारे 100 ग्रॅम कच्च्या पालकामध्ये 2.7 मिलीग्राम लोह असते. आपण आपल्या आहारात पालकाचा अनेक प्रकारे समावेश करू शकतो.
- भोपळ्याच्या बिया : भोपळ्याच्या बियांमध्ये लोहासह इतर जीवनसत्त्वे आहे. त्यात ए, सी, के बी 9 यांचा समावेश होतो. याशिवाय पोटॅशिअम, मॅंगनीज आणि कॅल्शिअम सारखी खनिजे भरपूर असतात.
- सोयाबीन : सोयाबीनमध्येही भरपूर लोह आहे. तसेच त्यात, प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. पचनाच्या समस्यांवर मात करण्यास सोयाबीनमुळे मदत होते. यामुळे आपली प्रतिकारशक्तीही वाढण्यास मदत होते.
- मांस : मांस लोहाच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे. नियमितपणे मांस खाल्ल्याने अशक्तपणा दूर होऊ शकतो. त्याच प्रमाणे यातून आपली रोगप्रतिकारशक्तीही वाढीस लागते, जे लोक मांसाहारी आहेत त्यांनी आपल्या आहारात याचे योग्य प्रमाण ठेवावे.
0 Comments